भजनी मालिका
← भजनांकडे परत

यावरी कंस भयाभीत । कृष्णभयें उव्दिग्नचित्त । बैसला असतां निजमंदिरांत । तंव आला अकस्मात रजक बळिया

yavari kans bhayabhit | krushnabhayen uvdignachitta | baisala asatan nijamandirant | tanv ala akasmat rajak baliya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यावरी कंस भयाभीत । कृष्णभयें उव्दिग्नचित्त । बैसला असतां निजमंदिरांत । तंव आला अकस्मात रजक बळिया ॥१॥ वस्त्रें आणिलीं घोवट । उंच धोऊनियां चोखट ॥ म्हणे राया राय तूं वरिष्ठ । शोभती विशिष्ट तुज अंगीं ॥२॥ मग ते लेवूं जों बैसला । तंव तो झगा पोकळ झाला । म्हणे थोर हा बेतियला । व्यर्थचि नासिला ये शिवणारें ॥३॥ राजा हांसूनि बोले त्यांसी । शिवणारें काय करील यासी । ॥३॥ राजा हांसूनि बोले त्यांसी । शिवणारे काय करील यासी । चिंतें व्यापिलें शरीरासी । तेणें हें कृशत्वासीं पावलें ॥४॥ गोकुळीं नंदाचिये घरीं । बाळ वाडे आमुचा वैरी । पहा तो भाचाचि निर्धारी । परी मुळावरी आमुचिया ॥५॥ तया वधलियावांचून निश्रचळ नव्हे आमुचें मन । रजक बळिया तें ऐकोन । म्हणे न करी चिंता महाराजा ॥६॥ निळा म्हणे गर्वीरुढ । मंद बुध्दी जल्पवाड । म्हणे मी वारीन हें सांकड । एकदां डोळां मल दावीं ॥७॥