भजनी मालिका
← भजनांकडे परत

यावरी गौळणी सुंदरी । नूऊनियां निजमंदिरीं । खेळविती परमात्मया श्रीहरी । नाना उपचारी पूजिती

yavari gaulani sundari | nuuniyan nijamandirin | khelaviti paramatmaya shrihari | nana upachari pujiti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यावरी गौळणी सुंदरी । नूऊनियां निजमंदिरीं । खेळविती परमात्मया श्रीहरी । नाना उपचारी पूजिती ॥१॥ देऊनियां चंदनउटी । केशरी टिळक लाविती लल्लाटीं । नाना सुमनहार कंठी । घालिती वरवंटी श्रीकृष्णा ॥२॥ गुंफूनी सुमनटोप शिरीं विचित्र तुरे खोंविती वरी । लेवूनियां दिव्य अळंकारीं । वस्त्रें परिधानें गौरविती ॥३॥ एकी जाणविती विंजणवारा । एकी चवरी विंजती सुंदरा । म्हणती वो नंदकुमारा । दासी आम्ही तुमचिया ॥४॥ शर्करा घृत परिपक्व लाडू । नाना स्वाद फळांचे घडू । आणूनियां करिती सुरवाडु । कृष्ण वदनीं समर्पिती ॥५॥ एकी उचलूनियां कडिये घेती । एकीं खांदिये बैसविती । एकी ह्रदयींची आळंगिती । चुंबन देती पैं एकी ॥६॥ निळा म्हणे परब्रम्ह सेजे । आवडीं घेऊनि निजतीं निजें । ऐशिया सुखाचीं नाचती भोजें । परमात्मा आप्त झालिया ॥७॥