भजनी मालिका
← भजनांकडे परत

यावरी बोलती गोवळ । तूंचि सकळ जाणतां

yavari bolati goval | tunchi sakal janatan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यावरी बोलती गोवळ । तूंचि सकळ जाणतां ॥१॥ कैसें जाणें येणें आम्हां । पुरुषोत्तमा तुजवीण ॥२॥ धन वित्त आमुचें गोत । तुंचि सतत जीवप्राण ॥३॥ निळा म्हणे वरदळ बोली । केली साहिली पाहिजे ते ॥४॥