भजनी मालिका
← भजनांकडे परत

यात्रा फिरोनियां माघारी । आली गोकुळाभीतरी । उव्देग करिती घरोघरीं । म्हणती अनर्थ् वोढवलां

yatra phironiyan maghari | ali gokulabhitari | uvdeg kariti gharogharin | mhanati anarth vodhavalan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यात्रा फिरोनियां माघारी । आली गोकुळाभीतरी । उव्देग करिती घरोघरीं । म्हणती अनर्थ् वोढवलां ॥१॥ इंद्र कोपलियावरी । अणुमात्रही वृष्टी न करी । बरग पाडूनियां दारीं । उरों नेदील शेंपूट ॥२॥ अनावृष्टी नव्हतां पीक । मरती दुष्काळें पिडती लोक । अथवा अतिवृष्टी करुनी सकळिक । बुडवील निमिषार्धे ॥३॥ भयचि अणुमात्र न वाटे कृष्णा । परि हा कोपलिया देवराणा । करील नाश एक क्षणा । पळमात्रही न लगतां ॥४॥ हें असो भक्षिला गोरस । तुप्ती सांडी उदगारास । वांकुल्याही गोवर्धनास । कृष्ण म्हणे रे दाखवा ॥५॥ हें इंद्र देखोनियां दृष्टीं । क्रोधें संतप्त झाला पोटीं । मेघा पाचारुनियां म्हणे वृष्टी । करा निर्घारें गोकुळावरी ॥६॥ पाचारुनि संवर्तका । म्हणे गोकुळीची नुरवीं मृत्तिका । मुसळधारीं वषोंनी उदका । मेळवीं नेउनी सागराच्या ॥७॥ येरु म्हणे बहुत बरें । आज्ञा केली ते सुरस्वरें । करीन परी एक दुसरें । पाहिजे मज साह्यार्थ ॥८॥ दयावा सवें प्रचंड वात । करावया गोकुळाचा घात । इंद्रे पाचारुनियां त्यातें त्वरित । म्हणे जावें याच्या संगे ॥९॥ निळा म्हणे स्वमुखें त्यासी । सांगे जाउनी गोकुळासी । मोडूनियां तेथचिया वृक्षांसी । घरां खोपटांसी उडवावें ॥१०॥