भजनी मालिका
← भजनांकडे परत

यातीसी नाहीं कारण । नामस्मरण हरीचें

yatisi nahin karan | namasmaran harichen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
यातीसी नाहीं कारण । नामस्मरण हरीचें ॥१॥ तेणें तराल भवपार । आणिक विचार न करा ॥२॥ मागां पहा अनुभव । तारिले जीव निर्जिव ॥३॥ स्त्रिया शूद्र नारी नर । नामें निर्धारा मुक्तिपद ॥४॥ एका जनार्दनीं नाम । जपा विश्रामदायक ॥५॥