भजनी मालिका
← भजनांकडे परत

यातिहीन असो भला । जो या गेला शरण संतां

yatihin aso bhala | jo ya gela sharan santan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
यातिहीन असो भला । जो या गेला शरण संतां ॥१॥ त्यांचें जन्ममरण चुकलें । पावन जाहलें तिहीं लोकीं ॥२॥ उत्तम अधम न म्हणती । समचि देती सर्वांसी ॥३॥ शरण एका जनार्दनीं । केलें पावन दीनालागुनी ॥४॥