भजनी मालिका
← भजनांकडे परत

याज्ञिक मंत्रे अवदान देती

yadnyik mantre avadan deti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
याज्ञिक मंत्रे अवदान देती । त्याहुनी अधिक या उच्छिष्टा बोराची प्रीती ॥१॥ हे काय अवगुण नव्हती सांगा । प्रत्यक्ष ठाऊकेचि आहेती जगा ॥२॥ सांडूनियां सेजे लक्ष्मी ऐसी । भोगितो विद्रूप कौंसाची दासी ॥३॥ घरींची दही दुधें या न लगती गोडें । चोरटा लोकांची मोडितो कवाडें ॥४॥ श्रुतिस्मृतीची ही वचनें नेघोनियां कानीं । हांसे श्रलाघे शिव्या देतां गवळणी ॥५॥ निळा म्हणे याची खोडीचि हे ऐशीं । ते बोलोनि काय मानली यासी ॥६॥