भजनी मालिका
← भजनांकडे परत

याचिये संगतीं दु:खाची विश्रांती । संसार वाताहाती होत असे

yachiye sangatin du:khachi vishranti | sansar vatahati hot ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
याचिये संगतीं दु:खाची विश्रांती । संसार वाताहाती होत असे ॥१॥ आम्ही प्रंपचीक करावा प्रंपच । हा तो निष्प्रपंच होउनी असे ॥२॥ येणें आमुच्या पोरा लावियेला चाळा । आपण निराळा राहुतसे ॥३॥ एका जनार्दनीं ऐशियाची माव । न येतां नामदेव कींव भाकी ॥४॥