भजनी मालिका
← भजनांकडे परत

याचे पायीं मनोरथ । पूर्ण काम सकळहि आर्त

yache payin manorath | purna kam sakalahi arta

रचनाकार: संत निळोबा · अभंग
याचे पायीं मनोरथ । पूर्ण काम सकळहि आर्त ॥१॥ म्हणोनियां धरिला जिवें । हाचि संतीं मनोभावें ॥२॥ इच्छिलिया पदा । नेतों देउनी सुख संपदा ॥३॥ निळा म्हणे खंडी मूळ । वासनात्मकाचें तात्काळ ॥४॥