भजनी मालिका
← भजनांकडे परत

या रे गडिहो घेऊं धणी । काला वदनीं श्रीहरीचा

ya re gadiho gheun dhani | kala vadanin shriharicha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
या रे गडिहो घेऊं धणी । काला वदनीं श्रीहरीचा ॥१॥ सांडूनियां अभिमान दुरी । नाचों फेरी गोविंदा ॥२॥ देखोनियां भाव अंतरींचा । देईल हातींचा विभाग ॥३॥ निळा म्हणे ब्रम्हारस । उरलें शेष हरीचें तें ॥४॥