भजनी मालिका
← भजनांकडे परत

या पोटाकारणें न करावें तें करिती । वेद ते विकिती थोर याती

ya potakaranen na karaven ten kariti | ved te vikiti thor yati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
या पोटाकारणें न करावें तें करिती । वेद ते विकिती थोर याती ॥१॥ नीचासी शब्दज्ञान सांगती ब्राह्मण । ऐकती ब्रह्माज्ञान त्यांचें मुखें ॥२॥ श्रेष्ठवर्ण होउनी नीचकर्म करिती । कांहीं न तें भीती पुण्यपापा ॥३॥ एका जनार्दनीं सांडोनि आचार । करिती पामर नानामतें ॥४॥