भजनी मालिका
← भजनांकडे परत

या हो या चला जाऊं कीर्तना । आनंद तेणें मना नाचती वैष्णव

ya ho ya chala jaun kirtana | anand tenen mana nachati vaishnav

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
या हो या चला जाऊं कीर्तना । आनंद तेणें मना नाचती वैष्णव ॥१॥ राम कृष्ण हरि वासुदेवा । गातती प्रेमभाव आवडी आदरें ॥२॥ सुख तेथें शांती विरक्ति कोण पुसे । सबाह्म अभ्यंतरीं अवघा वासुदेव वसे ॥३॥ एका जनार्दनीं वासुदेवीं मन । जन वन तेथें अवघा जनार्दन ॥४॥