भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यापक व्यापला तिहीं त्रिभुवनीं । चारी वर्ण खाणी विठू माझा

vyapak vyapala tihin tribhuvanin | chari varna khani vithu majha

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
व्यापक व्यापला तिहीं त्रिभुवनीं । चारी वर्ण खाणी विठू माझा ॥१॥ शंख चक्र करीं वैजयंती माळा । नेसला पिवळा पितांबर ॥२॥ कटावरी जेणें कर हे ठेविले । ध्यान मिरविलें भीमातिरीं ॥३॥ चोखा म्हणे माझा आनंदाचा कंद । नाम हे गोविंद मिरविलें ॥४॥