भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यापक हा हृषिकेशी । आहे तुम्हा पाशी

vyapak ha hrushikeshi | ahe tumha pashi

रचनाकार: संत बोधले · अभंग
व्यापक हा हृषिकेशी । आहे तुम्हा पाशी । विश्वास मानसी धरा थोर ॥१॥ चालविता बोलविता । सकळ त्याची सत्ता । त्या वाचुनी कर्ता नाही कोण्ही ॥ २॥ खास सुत्रधारी । खेळविता दोरी । नाचवी नानापरि । बाहुलिया ॥३॥ बोधला म्हणे मीपण सांडा जाण । कर्ता नारायण पांडुरंग ॥४॥