भजनी मालिका
← भजनांकडे परत

वृत्तीचा उच्छेद मना निग्रह

vrutticha uchchhed mana nigrah

वृत्तीचा उच्छेद मना निग्रह । धारण विग्रह तेजतत्त्वीं ॥१॥ बिंबामाजि बिंब हरपलें स्वयंभ । मायेचा पैं लोभ अरता जाला ॥२॥ नाहीं तेथें छाया मायेचा विलास । घरभरीं पैस दीपीं रया ॥३॥ बापरखुमादेविवर ज्ञानदेवा धन । वस्तूची विवरण तेजाकारें ॥४॥