भजनी मालिका
← भजनांकडे परत

वृंदावनीं वनमाळी

vrundavanin vanamali

वृंदावनीं वनमाळी । खेळे गोपींसी धुमाळी । मदनमेचुची नवाळी । रसाकाळीं मनोहर ॥१॥ तयाचे करी पा स्मरण । आळसु न करी अंत:करण । भीतरलीया सुमनपण । निहारण होईल ॥२॥ बरवेपणाचेनि मिसें देवातें वाणि या सौरसे । जडत्त्व फ़िटेल तया सरिसें । रसनें ऐसें चुकों नको ॥३॥ तरी हा देवो तूं न्याहाळीपां । पिसाटपण फ़िटेल बापा । पावन होसी परमस्वरुपा । नेत्री ऐसा चुकों नको ॥४॥ वेगीं क्षेम देऊनिया निविजे । ऐसें दैव कैं लाहिजे । जरी तो ह्र्दयीं ध्याईजे । तै पाविजे अंगसुखा ॥५॥ मन भ्रमर येकी हेळा । झेपावे पदकमळा । बापरखुमादेविवरा विठ्ठला । होईल जवळा सौरसु ॥६॥