भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्रतें तपें तीर्थे तवचि वरी गर्जती

vraten tapen tirthe tavachi vari garjati

व्रतें तपें तीर्थे तवचि वरी गर्जती । जंव देखिलें नाहीं तुवा तूंतें ॥ जेथें वेदा मौन पडे श्रुति नेति नेति म्हणोनि बहुडे । तें सुख वाडेकोडें भोगिजेसु ॥१॥ नाहीं आपण पै सौरसु कां करिसी हव्यासु । लटिकाचि मायाभासु मिथ्या भ्रमु ॥ सिध्दचि असतां करिसी साधनाची चाड । सुख सांडुनी दु:ख वाड भोगितासी रया ॥२॥ या विश्वायेवढा जगडंबरु पसारा । देखोनियां सैरा मन धांवें तुझें ॥ मृगजळ देखोनि मृगें आलीं टाकोनि । जीवन म्हणौनि तान्हा फ़ुटोनि मेलीं ॥३॥ आतां तुज नलगे कष्टावें जें असेल स्वभावें । नेमिलें देवें तें न चुकें ब्रह्मादिकां ॥ उमप सांडूनि करिसी दैन्याचे डोहळे । निधान देखोनि डोळे वायां झांकूं नको ॥४॥ थोडें हें सांडी परौते बहुत तें घेई अरौतें । जें चाळितें तूंतें आणि विश्वातें मागें ॥ जें केलें तें अवघे यांतुनि निमाले । आतां पाहतां तुझियेनि बोलें बंधमुक्त रया ॥५॥ पुत्र कळत्र वित्त हा तो मिथ्या मोहो । तो आपुलासाचि चावो मानेल तुज ॥ नखापासूनि शिखा व्यापूनिया आहे । बापरखुमादेविवरुविठ्ठलु ह्रदयींचा ध्यायि सुखें रया ॥६॥