भजनी मालिका
← भजनांकडे परत

विवाद वाद हें तो अधम लक्षण । भक्तीचें कारण न साधे येणे

vivad vad hen to adham lakshan | bhaktichen karan na sadhe yene

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विवाद वाद हें तो अधम लक्षण । भक्तीचें कारण न साधे येणे ॥१॥ मुख्य एक करी एकविधपण । सम दरुशनें देखें जगीं ॥२॥ नर अथवा नारी असो भलते याती । वंदावे विभूति म्हणोनियां ॥३॥ एका जनार्दनीं बोध धरी मना । होऊनियां साना सानाहुनी ॥४॥