भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान । नाहीं आम्हां चिंतन दुजियांचे

viththalavanchunin anikache dhyan | nahin amhan chintan dujiyanche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान । नाहीं आम्हां चिंतन दुजियांचे ॥१॥ आमुचे कुळींचे विठ्ठल दैवत । कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥ विठ्ठलावांचुनी नेणों क्रियाकर्म । विठठलावांचुनी धर्म दुजा नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठल भरला । भरुनीं उरला पंढरीये ॥४॥