भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठलासी गाय विठ्ठलासी ध्याय । विठ्ठलासी पाहे वेळोवेळां

viththalasi gay viththalasi dhyay | viththalasi pahe velovelan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विठ्ठलासी गाय विठ्ठलासी ध्याय । विठ्ठलासी पाहे वेळोवेळां ॥१॥ विठ्ठल विसावा सोडवला जीवां । म्हणोनि त्याच्या गांवा जावें आधीं ॥२॥ विठ्ठलावाचुनी सोयरा जिवलग । विठ्ठलाचि मार्ग जपा आधीं ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठलावांचोनि । दुजा नेणे स्पप्नी संग कांही ॥४॥