भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल विठ्ठल वदतां वाचे । स्वरुप त्यांचे ठसांवे

viththal viththal vadatan vache | svarup tyanche thasanve

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विठ्ठल विठ्ठल वदतां वाचे । स्वरुप त्यांचे ठसांवे ॥१॥ हा तो अनुभवा अनुभव । निरसे भेव काळांचे ॥२॥ रुप देखतां आनंद । जन्म कंद तुटे तेणें ॥३॥ एका जनार्दनीं मन । जडोन ठेलें चरणीं ॥४॥