भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल विठ्ठल म्हणतां वाचे । स्वरुप त्याचें आठवे

viththal viththal mhanatan vache | svarup tyachen athave

रचनाकार: संत निळोबा · अभंग
विठ्ठल विठ्ठल म्हणतां वाचे । स्वरुप त्याचें आठवे ॥१॥ शामसुंदर कटीं कर । रुप मनोहर तेजस्वी ॥२॥ दिव्य सुमनें तुळसीमाळा । मळवट पिंवळा रेखियेला ॥३॥ निळा म्हणे मुगुटावरी । खोंविल्या मंजरी कोंवळियां ॥४॥