भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल पंढरपुर निवासी । विठ्ठल उभा भिवरेसी । विठ्ठल पुंडलिकापाशीं । भक्ति प्रेमेशीं तिष्ठत

viththal pandharapur nivasi | viththal ubha bhivaresi | viththal pundalikapashin | bhakti premeshin tishthat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विठ्ठल पंढरपुर निवासी । विठ्ठल उभा भिवरेसी । विठ्ठल पुंडलिकापाशीं । भक्ति प्रेमेशीं तिष्ठत ॥१॥ जाई जाई मना तेथें । सुखें वैष्णव नाचती जेथें । ब्रह्मानंदपद दरुशनमात्रें । देत आहे भक्तांसी ॥२॥ सुलभ सुलभ मंत्रराज । शंभु जाणे निजबीज । एका जनार्दनीं गुज । सांगतसे भाविकां ॥३॥