भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल पाहुणा आला आमुच्या घरी

viththal pahuna ala amuchya ghari

रचनाकार: संत बोधले · अभंग
विठ्ठल पाहुणा आला आमुच्या घरी । लिंब लोण करी सावळिया ॥१॥ दुरल्या देशीचा माझ्या आवडीचा । भिवराथडीचा नारायण ॥ २॥ षड्रस पक्वान्न वाढियेले ताट । जेऊ एकवटी बोधला म्हणे ॥३॥