भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल नाम घेती वाहाती टाळिया । ब्रह्मादिक येऊनियां वंदिती पायां

viththal nam gheti vahati taliya | brahmadik yeuniyan vanditi payan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विठ्ठल नाम घेती वाहाती टाळिया । ब्रह्मादिक येऊनियां वंदिती पायां ॥१॥ धन्य धन्य हरिभक्त जगीं । वाहाताती टाळी नाचताती रंगीं ॥२॥ पेमभरित सदा करिती कीर्तन । एका जनार्दनीं वंदूं तयाचे चरण ॥३॥