भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठोबाचे नाम जीवाचा विश्राम

vithobache nam jivacha vishram

रचनाकार: संत बोधले · अभंग
विठोबाचे नाम जीवाचा विश्राम । तोडियेला प्रेम संसाराचा ॥१॥ नामाचा महिमा कळला नारायणा । लक्ष चौऱ्यांशी भ्रमणा चुकविल्या ॥२॥ बोधला म्हणे साक्ष आली माझे माना । सांगतो सज्जना एकभावे ॥३॥