भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटंबुनि काया दंड धरी करीं

vitambuni kaya dand dhari karin

विटंबुनि काया दंड धरी करीं । हिंडे घराचारी नवल पाहे । असमाधानी विषयीं विव्हळ । तरी दंडु केवळ काजा काई ॥१॥ सिध्दचि असतां कां गा विटंबिसी । संन्यासी तूं जाण कैसा ॥२॥ निजाश्रमींच वास संकल्पासी त्यागी । सर्वस्वें वैरागी । तोचि तो संन्यासी । संगीं असंगता तोचि जाण संन्यासी । स्वरुप तयापाशीं जवळी आहे ॥३॥ बापरखुमादेविवरु उघडचि संन्यासी । तोचि पूर्ण भासीं भरला असे । निवृत्तिरायें खुणा दाखविला निरुता । तो जाणण्या परता सदोदितु ॥४॥