भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वास धरावा मनी । मग पुरवीत आहे धनी

vishvas dharava mani | mag puravit ahe dhani

रचनाकार: संत बोधले · अभंग
विश्वास धरावा मनी । मग पुरवीत आहे धनी । उपमन्यालागोनि । कैसे केले ॥१॥ अज्ञान लेकरु । परि केलासे निर्धारु । दिधला क्षीरसागरु । तयालागी ॥२॥ ऐसा कृपासिंधु । अनाथाचा बंधु । बहुतांसि आनंदु । केला त्याने ॥३॥ जे जे ऐकत होतो कानी । ते पाहिले नयनी । बोधला चरणी विनटला ॥४॥