भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वपाळिता हे हरी । दासा केवीं तो अव्हेरी

vishvapalita he hari | dasa kevin to avheri

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विश्वपाळिता हे हरी । दासा केवीं तो अव्हेरी ॥१॥ नव मास गर्भवास । नाहीं भागला आम्हांस ॥२॥ बाळपणीं वांचविलें । स्तनीं दुग्ध तें निर्मिलें ॥३॥ कीटक पाषाणांत वसे । त्याचें मुखीं चारा असे ॥४॥ धरा धरा हा विश्वास । एका जनार्दनीं त्याचा दास ॥५॥