भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वाचा तो गुरु । स्वामी निवृत्ति दातारु

vishvacha to guru | svami nivrutti dataru

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विश्वाचा तो गुरु । स्वामी निवृत्ति दातारु ॥१॥ आदिनाथापासून । परंपरा आली जाण ॥२॥ ज्ञानदेवा ज्ञान दिलें । चांगदेवातें बोधिलें ॥३॥ तोचि बोध माझे मनीं । राहो एका जनार्दनीं ॥४॥