भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्व ब्रह्म भासे ऐक्य येतां देहीं

vishva brahma bhase aikya yetan dehin

विश्व ब्रह्म भासे ऐक्य येतां देहीं । अनुहातीं पाहीं अपार नाद ॥१॥ देखिला परी संयोगें व्यापला । विश्व तरीच झाला बाईयानो ॥२॥ पिंड ब्रह्मांडाचा विस्तार विस्तारला । माझा मीच झाला कोणकरी ॥३॥ ज्ञानदेव म्हणे या अर्थाची सोय । धरी माझी माय मुक्ताबाई ॥४॥