भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्रांतीचें आसन घालुनियां जपा । मंत्र तोचि सोपा रामनाम

vishrantichen asan ghaluniyan japa | mantra tochi sopa ramanam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विश्रांतीचें आसन घालुनियां जपा । मंत्र तोचि सोपा रामनाम ॥१॥ सर्व याती वर्णा आहे अधिकार । रामनाम उच्चार सोपा बहु ॥२॥ कल्पना अविद्या टाकुनी उपाधी । रामनामें समाधि उघड दिसे ॥३॥ एका जनार्दनीं नाम पवित्र परिकर । साधनाचें सार हेंचि एक ॥४॥