भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्रांति मनाची निजशांति साची

vishranti manachi nijashanti sachi

विश्रांति मनाची निजशांति साची । मग त्या यमाची भेटी नाहीं ॥१॥ अधिकारी मन मग सारी स्नान । रोकडेंचि साधन आलें हाता ॥२॥ साधिलें साधन नित्य अनुष्ठान । चित्तीं नारायणमंत्र जपे ॥३॥ मुक्ताई प्रवीण नारायण धन। नित्य मंत्र स्नान करीं वेगीं ॥४॥