भजनी मालिका
← भजनांकडे परत

विष्णुवीण मार्ग घेसील अव्यंग

vishnuvin marga ghesil avyang

विष्णुवीण मार्ग घेसील अव्यंग । तरी वायांचि सोंग करणी तुझी ॥१॥ येऊनि संसारा वायांचि उजिगरा । कैसेनि ईश्वरा पावशी हरी ॥२॥ नरदेह कैचेम तुज होय साचें । नव्हेरे हिताचें सुख तुज ॥३॥ ज्ञानदेव म्हणे शरण रिघणें । वैकुंठींचें पेणें अंती तुज ॥४॥