भजनी मालिका
← भजनांकडे परत

विष्णुवीण जप व्यर्थ त्याचें ज्ञान

vishnuvin jap vyartha tyachen dnyan

विष्णुवीण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा । रामकृष्णी पैठा कैसेनि होय ॥२॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडेल नामीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपचाचें ॥४॥