भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषयाचे अभिलाषे सबळ भेदु भासे । विषयलेषु तेथें मुक्ति केवीं वसे

vishayache abhilashe sabal bhedu bhase | vishayaleshu tethen mukti kevin vase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विषयाचे अभिलाषे सबळ भेदु भासे । विषयलेषु तेथें मुक्ति केवीं वसे ॥१॥ विषयतृष्णा सांडी मग तूं साधन मांडी । वैराग्याची गोडी गुरुसी पुसे ॥२॥ स्त्रीपुरुष भावना भेदु भासे मना । तेथें ब्रह्माज्ञाना गमन कैंचें ॥३॥ कणुभरित जो डोळा शरीरासी दे दुःख । अणुमात्र विषय तो संसारदायक ॥४॥ शुद्धभाव तें वैराग्य आवडे । अति विषय विषयाधीन ते किडे ॥५॥ एका जनार्दनीं निजज्ञानशक्ति । निर्विषय मन ते अभेद भक्ति ॥६॥