भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषया जो लंपट । तया नावडे ही वाट । पंढरी सुभट । नावडेचि पापिष्ठा

vishaya jo lampat | taya navade hi vat | pandhari subhat | navadechi papishtha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विषया जो लंपट । तया नावडे ही वाट । पंढरी सुभट । नावडेचि पापिष्ठा ॥१॥ अमृत फळें पूर्ण आलीं । कां गा जैसी परी जालीं । तैसीच हे चाली । पापिष्ठाची जाणावी ॥२॥ धनलुब्धका नावडे धर्म । मद्यपिया नावडे कर्म । जारासी संतसमागम । नाठवेचि सर्वथा ॥३॥ स्त्रीलुब्ध परद्वारी । काय तया गीता निर्धारी । एका जनार्दनीं हरी । नको संग तयाचा ॥४॥