भजनी मालिका
← भजनांकडे परत

विपरीत सुपरीत हा तो काळाचा विभाग । तेथें त्याग भोग करूनी काय

viparit suparit ha to kalacha vibhag | tethen tyag bhog karuni kay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विपरीत सुपरीत हा तो काळाचा विभाग । तेथें त्याग भोग करूनी काय ॥१॥ होणार तें होतें आपुलें न चले कांहीं । वायां दुःख पाहीं मानू नये ॥२॥ जी जी संचितीं लिहिलीसे रेखा । ती तों ब्रह्मादिकां न चुकेचि ॥३॥ एका जनार्दनीं वायां कां सायास । सुखदुःख लेश पूर्व कर्म ॥४॥