भजनी मालिका
← भजनांकडे परत

विधियुक्त पाणिग्रहण पैं जाहलें । जामातालागीं वहिलें काय बोले

vidhiyukta panigrahan pain jahalen | jamatalagin vahilen kay bole

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विधियुक्त पाणिग्रहण पैं जाहलें । जामातालागीं वहिलें काय बोले ॥१॥ तुम्ही हरिभक्त दुजा नाहीं भाव । चालवा गौरव उभयतां ॥२॥ एक एकपणें न धरावें भिन्न । पाळावें वचन वडिलांचें ॥३॥ एका जनार्दनीं सांगूनियां मात । घातली शपथ विठोबाची ॥४॥