भजनी मालिका
← भजनांकडे परत

विधिनिषेध धरितां मनीं । सहजें कार्य होय हानीं

vidhinishedh dharitan manin | sahajen karya hoy hanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विधिनिषेध धरितां मनीं । सहजें कार्य होय हानीं ॥१॥ जें जें वेळे जें जें घडे । विधिनिषेध सर्व जोडे ॥२॥ अन्य नाहीं विचारणा । कार्यकारण सर्व जाणा ॥३॥ एका जनार्दनीं खूण । जाणते ते परिपुर्ण ॥४॥