भजनी मालिका
← भजनांकडे परत

विचारितां देहीं अविचार अंबुला

vicharitan dehin avichar ambula

विचारितां देहीं अविचार अंबुला । न साहे वो साहिला काय करुं ॥१॥ सखि सांगें गोष्टी चाल कृष्णभेटी । आम्ही तुम्हीं शेवटीं वैकुंठीं नांदों ॥२॥ येरि सांगे भावो जावें वो प्रवृत्ती । तव वरि गति येता नये ॥३॥ ज्ञानदेवो प्रवृत्ती निघालीया तत्परा । हरि आला सत्वरा तया भेटी ॥४॥