भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेष घेउनी नुसता कां । उगेच जगावरी रुसतां कां

vesh gheuni nusata kan | ugech jagavari rusatan kan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेष घेउनी नुसता कां । उगेच जगावरी रुसतां कां । भोग देखोनि घुसतां कां । आम्हीं भले म्हणोनि पुसतां कां ॥१॥ थिता बाईल कां सांडिली । आशा परवंधूं कां धुंडिली । शुभ्र सांडोनि भगवी कां गुंडिली । ऐसी भंडी कांहो मांडिली ॥२॥ तुम्हा प्रपंचावर एके घाई रुसवेना । अहं ज्ञातेपणा कोण्हा पुसवेना । एका जनार्दनीं मन जिंकवेना । मेल्या कुतर्‍यासारखें कां बसवेना ॥३॥