भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेधोनि गेलें माझें मन । हारपलें दुजेंपण

vedhoni gelen majhen man | harapalen dujempan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेधोनि गेलें माझें मन । हारपलें दुजेंपण ॥१॥ ऐसी ब्रह्मामूर्ति दत्त । वोतलीसे आनंदभरीत ॥२॥ तयाविण ठाव । रिता कोठें आहे वाव ॥३॥ एका जनार्दनीं भरला । सबाह्म अभ्यंतर व्यापिला ॥४॥