भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदवाणी देवें केली । येर काय चोरापासून झाली

vedavani deven keli | yer kay chorapasun jhali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदवाणी देवें केली । येर काय चोरापासून झाली ॥१॥ सकळ वाचा वदवी देव । कां वाढावा अहंभाव ॥२॥ ज्या ज्या वाणी स्तुती केली । ते तीक देवासी पावली ॥३॥ एका जनार्दनीं मातु । वाचा वाचक जगन्नाथु ॥४॥