भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदशास्त्र पुराणें अनेक शब्दज्ञानें । भारताचे श्रवणे सर्वस्व जोडे

vedashastra puranen anek shabdadnyanen | bharatache shravane sarvasva jode

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदशास्त्र पुराणें अनेक शब्दज्ञानें । भारताचे श्रवणे सर्वस्व जोडे ॥१॥ ते सव्वालक्ष भारत जोडे पैं सुकृत । तेंचि गीते सात शतें प्राप्त होय ॥२॥ ऐशी भगवदगीता कृष्णार्जुन संवादतां । तेंचि फ़ळ लाभे वाचितां ऐक्यभावें ॥३॥ गीतीचें महा नेमें करा श्रवण पठण । ऐसें एका जनार्दन सांगतसे ॥४॥