भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदांचे वचन शास्त्रांचे अनुमोदन । पुराणीं कथन हेंचि केलें

vedanche vachan shastranche anumodan | puranin kathan henchi kelen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदांचे वचन शास्त्रांचे अनुमोदन । पुराणीं कथन हेंचि केलें ॥१॥ कलियुगामाजीं नाम एक सार । व्यसाची निर्धार वचनोक्ति ॥२॥ तरतील येणें विश्वासी जे नर । तत्संगें दुराचार उद्धरती ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा हा अनुभव । प्रत्यक्ष सांगे देव उद्धवासी ॥४॥