भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदांचे सार निगमाचे माहेर तो हा परात्पर उभा विटे

vedanche sar nigamache maher to ha paratpar ubha vite

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदांचे सार निगमाचे माहेर तो हा परात्पर उभा विटे ॥१॥ शास्त्रांचे निजगह्र पुराणाचे निजसार । तो हा विश्वभर उभा विटे ॥२॥ काळाचा तो काळ भक्तांचा प्रतिपाळ । तो हा दीनदयाळ उभ विटे ॥३॥ एका जनार्दनीं शोभे दीनमणीं । भक्त भाग्य धणी पंढरीये ॥४॥