भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदांचा विवेक शास्त्रांचा हा बोध । तो ह परमानंद विठ्ठलमूर्ती

vedancha vivek shastrancha ha bodh | to ha paramanand viththalamurti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदांचा विवेक शास्त्रांचा हा बोध । तो ह परमानंद विठ्ठलमूर्ती ॥१॥ पुराणासी वाड साधनांचे कोड । ते गोडांचे गोड विठ्ठलमूर्ती ॥२॥ ब्रह्मादि वंदिती शिवादी ज्या ध्याती । सर्वांसी विश्रांती विठ्ठलमूर्ती ॥३॥ मुनीजनांचे ध्यान परम पावन । एका जनार्दनीं पावन विठ्ठलमूर्ती ॥४॥