भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदाचिया बोला कर्मातें गोंविला । परी नाहीं भजला संतालागीं

vedachiya bola karmaten gonvila | pari nahin bhajala santalagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदाचिया बोला कर्मातें गोंविला । परी नाहीं भजला संतालागीं ॥१॥ घोकूनियां वेद द्वैत नवजाय । वाउगाची होय श्रम तया ॥२॥ तया अद्वैताच्या वाटां जायतो करंटा । शीण तो अव्हाटा आदिअंत ॥३॥ एका जनार्दनीं संतांसी शरण । गेलीया पठण सर्वजोडे ॥४॥