भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेद वेद ब्रह्मा एक । स्वानुभवें तैसेंच देख

ved ved brahma ek | svanubhaven taisench dekh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेद वेद ब्रह्मा एक । स्वानुभवें तैसेंच देख ॥१॥ हा वेदाचा गौरव । कोण घेतो अनुभव ॥२॥ वेद ब्रह्मास्थिति । कोण प्रतिपाद्य करिती ॥३॥ वेदी ब्रह्माचें ब्रह्मापण। शरण एका जनार्दन ॥४॥